नेवासा : दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे. प्रती लिटर दुधाला ३० रुपये दर द्यावा. दूध भुकटीसाठी प्रती किलो ५० रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी नेवासा तालुका भाजपच्या वतीने शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी नेवासा बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
सरकारचा निषेध करीत उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला.यावेळी माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शहराध्यक्ष मनोज पारखे, रामभाऊ खंडाळे, निरंजन डहाळे, सुभाष पवार, नगरसेवक सचिन नागपूरे, विवेक ननवरे, ज्ञानेश्वर टेकाळे, संदीप आलवणे, सतीश गायके, अंकुश काळे, सुनीलराव वाघ, भास्कर कनगरे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. यादरम्यान शेवगाव-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.