प्रश्न: निवडणूक तुम्ही प्रतिष्ठेची केली, यामागे नेमकी भूमिका काय?खा. गांधी : निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाची कामे करायची हा उद्देश असतो. त्यासाठीच जनतेने मला तीनवेळा खासदार केले. माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पक्षाने मला शहराचे अध्यक्षही केले आहे. देशाचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. स्मार्ट सिटीचे मूल्यमापन सुरू असताना देशामध्ये नवनवीन संकल्पना पाहतो. त्या संकल्पना आपल्या शहरातही साकारता येतील. त्यासाठी महापालिकेत भाजपला स्वबळावर सत्ता असेल तरच शहराचा विकास वेगाने करू शकतो. स्थानिक पातळीवर योग्य वाटेल ते करायचे, असा पक्षाचा आदेश आहे. इथे स्वबळावर निवडणूक लढवित आहोत. शहराचे स्टेटस निर्माण करण्यासाठी नगरपालिकेची महापालिका व्हावी, यासाठी आम्हीच सर्वात आधी पुढाकार घेतला होता. केंद्र व राज्याचे अनुदान थेट मिळविणे हाच त्यामागे उद्देश होता. आता याचसाठी काम करायचे आहे.व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.
प्रश्न- भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे, असा सुजय विखे यांचा आरोप आहे?गांधी- काँग्रेसवाल्यांनी आदर्शचे धडे देण्याची गरज नाही. निवडणुकीमध्ये प्रत्येक माणसाचे मूल्यमापन केले जाते. यश-अपयशाचा विचार करून उमेदवारी देण्याचा निर्णय घ्यावा लागतो. राजकारणात बदल होत असतात. संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करीत आहोत. १९८० पासून शहरात सलगपणे भाजपाचे काम करीत आहे. जे गुन्हेगार (संदीप कोतकर) आहेत, त्यांचे फोटो लावू नका, अशा सूचना उमेद्वारांना दिलेल्या आहेत.प्रश्न- प्रोफेसर व्यापारी संकुलाचे काय?गांधी- प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुलाची निविदा राज्य शासनाकडून आम्हीच रद्द करून आणली. कारण १४० कोटीची मालमत्ता अशी कवडीमोल दराने विकायची नव्हती. शहर टपरीमुक्त करायचे ध्येय आहे. रस्त्यावरला विक्रेता दुकानात न्यायचा आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करायची आहे. सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या जमिनी उपयोगात आणण्याचे पहिले काम राहणार आहे.प्रश्न : शहरासाठी कोणत्या योजना आणल्या?गांधी- सौर ऊर्जेचा २९ कोटीचा प्रकल्प, पाणी पुरवठा सक्षमीकरणासाठी १०० कोटीची अमृत योजना, ३२० कोटी रुपयांची भुयारी गटार योजना,२८ कोटीची स्वच्छ भारत योजना अशा योजना शहरासाठी आणल्या आहेत.प्रश्न- यापूर्वी शहराला निधी का नाही मिळाला?गांधी- प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. सत्ता मिळाल्यास तीनशे कोटी देऊ असे ते म्हणाले. वेगवेगळ््या विकासासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये दिले आहेत. दीड वर्षे महापालिकेने आम्हाला नाचविले. त्यामुळे आम्ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला. मात्र आचारसंहितेमुळे कामे थांबली. महापालिकेला शहर विकासाचे व्हीजन नाही. केवळ ते बोलत होते, बेसिक चर्चा कधीच केली नाही. सौरऊर्जेचा प्रकल्प आणला. मात्र त्याला सल्लागार नियुक्त करण्याची तयारीही महापालिकेने म्हणजे शिवसेनेने दाखविली नाही. अन्यथा विजेबाबत महापालिका स्वयंपूर्ण झाली असती. तीन महिन्याचे काम दीड वर्षे झाले तरी झाले नाही.प्रश्न- भाजपमध्ये सर्व गट एक आहेत का?गांधी- आ.शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे, हे प्रत्येकवेळी सांगितलेच पाहिजे असे नाही. त्यांच्याकडे बऱ्याच जबाबदाºया आहेत. पक्षात कोणताही गट नसून सर्व एक आहेत.प्रश्न- दबाव निवडणूक यंत्रणेवर आहे का?गांधी- हे सर्व आरोप आहेत. भाजपची वाहने आरटीओने सोडून दिली, अशीच चर्चा होती. डीम परमिशन कशाला म्हणतात, हेच आरोप करणाºयांना माहिती नाही. परवानगीसाठी अर्ज सादर केले होते. गाड्या तयार केल्या होत्या. मात्र वापरात नव्हत्या. अर्धवट ज्ञानाच्या आधारावर आरटीओने ही वाहने पकडली. कोणताही प्रचार विनापरवाना करणार नाही. आरटीओवर आमचा दबाव नव्हता.प्रश्न- विकास कामांबाबत सर्वच पक्ष टोलवाटोलवी करतात.गांधी- नगरमधील नेते, कार्यकर्ते व्यक्तीद्वेषाने प्रेरित झालेले आहेत. चांगल्या सूचनांसाठी मदतीचे आश्वासन दिले की लोकांना भीती वाटते. खासदारांचे नाव लागेल म्हणून काही लोक शासनाकडे पाठपुरावाच करीत नाहीत. फक्त नेत्यांच्या इगोमुळे सगळे घडते आहे. मालमत्ता कराचे संकलन होत नाही. शॉपिंग सेंटर बंद पडले आहेत. मंगल कार्यालये चालत नाहीत. नालेगाव, सौभाग्य सदनची दुरवस्था झाली आहे. शहरातील गोर-गरिबांसाठी आतापर्यंत काहीच काम झाले नाही. बीआरजीएफच्या माध्यमातून ११ कोटी रुपये शहरासाठी दिले. आजपर्यंतच्या सत्ताधाºयांनी गटारीच केल्या. एवढ्या गटारी होत असतील तर मग ड्रेनेजची योजना कशाला? कोणती गटार किती वेळा होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.सत्ता आली तर...सगळ््या उपनगरांमध्ये काँक्रिटचे रस्ते, युटिलिटी गटार, सिमेंटमध्ये केमिकल टाकून रस्ते आणखी काँक्रिट (पक्के)करणार आहोत. असे रस्ते पन्नास वर्षे फोडणे शक्य होणार नाही. रस्ते चांगले झाले की विकास वेगाने होईल. शहरात जेवढ्या मोकळ््या जागा आहेत, त्या स्वयंसेवी संघटना, वेगवेगळ््या समाजाच्या लोकांना विकसित करण्यासाठी दिल्या जातील. त्यांनी जागा विकसित करायच्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तिथे जागा उपलब्ध करून दिली जाईल. नगरचे एस.टी. बसस्थानक नाशिकसारखे का झाले नाही?हे दुर्दैव आहे. नगरच्या रेल्वेचे दुहेरीकरण होते आहे. रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण होईल. नगर-पुणे रेल्वे शटल सेवा कार्यान्वित होईल.व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.
ठळक....रासपच्या प्रमुखांशी चर्चा केली होती. प्रवेशाच्या कार्यक्रमातही रासपचे प्रतिनिधी होती. उमेद्वार इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र नंतर पाच-सहा उमेदवार त्यांनी जाहीर केले. रासपही आमच्यासोबत आला नाही.धनवान, तोडफोडीसाठी जो पैसे लावतो, त्यालाच उमेदवारी दिली जाते, त्यामुळेच उमेदवार जाहीर केला जात नाही, असा लोकांचा आरोप आहे. याबाबत खा. गांधी म्हणाले, एकहाती सत्ता दिली तर ६०च्या नव्हे १२० च्या स्पीडने पळू शकतो. गरज पडली तर कोणाची मदत घेणार, यावर त्यांनी ही जर-तरची बाब असल्याचे स्पष्ट केले.अतिक्रमण केल्याचा आरोप चुकीचा आहे. केवळ त्यात राजकारण झाले. हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. सामान्य माणसाला लोकप्रतिनिधीवर आरोप करणे सोपे आहे. राजकीय प्रवासात कुठेही चूक केली नाही. पारदर्शकपणे काम केले. झोपडीमुक्त आणि टपरीमुक्त शहर करायचे आहे. हीच स्मार्ट सिटीकडे वाटचाल आहे. खासदार निधीमधून १९९९ मध्येच गावे टपरीमुक्त केली. ४५ गावे दत्तक घेतली. शंभर ठिकाणी शासनाच्या योजना गावाभोवती फिरल्या. कोणतेच काम लपून छपून नाही.अटलबिहारी पंतप्रधान असतानाच एमआयडीसीमध्ये रिशेड्युलिंग करून अनेक उद्योगांना पैसे दिले. वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी भूसंपादन केले. तेथे स्थानिक नेत्यांचा विरोध होता. शेवटी बागायती जमिनी वगळण्याचा विषय घेतला. सुपा एमआयडीसीचे नाव झाले तर नगर एमआयडीसी बदनाम झाली. इथे उद्योजकांना मारहाण झाली. त्यामुळे कंपन्या स्थलांतरित झाल्या. महापालिकेच्या माध्यमातून शहराची प्रतिमा बदलू शकतो. सुपा येथे जपानी पार्क होत आहे. शहरातील लोकांना रोजगार देण्यासाठी नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.