कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शिवजयंती मिरवणुकीस यावर्षी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे समितीच्या वतीने १०३ शिवप्रेमींनी रक्तदान करून आणि २५४ व्यक्तींनी रक्तगट, शुगर तपासणी करून शिवजयंती साजरी करण्यात आली. थत्ते मैदानाजवळील शिवबा हॉल येथे रक्तदान, रक्तगट व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दादा बोंबले व भागीरथी बोंबले आणि विजय आसने व केशरबाई आसने या ज्येष्ठ दाम्पत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
नित्यसेवा ब्लड बँकेचे डॉ. राजाराम व अनुराधा जोंधळे यांनी रक्तसंकलन केले. लक्ष्मीकांत शिंदे, योगेश मरकड, योगेश कानडे यांनी २५४ व्यक्तींची रक्तगट व शुगर तपासणी केली. यावेळी संदीप शाह यांनी ९०, तर राहुल उंडे यांनी ७५ वेळा रक्तदान केले. शरद नवले, बाबासाहेब खोसरे, प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष किशोर निर्मळ, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षा सीमा जाधव, सचिव रावसाहेब तोडमल यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मुळा-प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाने, पंचायत समिती सभापती संगीता शिंदे, इंद्रनाथ थोरात, सचिन गुजर, बाबासाहेब कोळसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, शिवसेना शहरप्रमुख सचिन बडधे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, हेमंत ओगले, नगरसेवक मनोज लबडे, भारती कांबळे, सुधीर नवले, यादवराव लबडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, योग प्रशिक्षक अनिल कुलकर्णी, डॉ. महेश क्षीरसागर, रितेश रोटे, लकी सेठी, अर्चना पानसरे यांनी अभिवादन केले.
---------
फोटो ओळी : १९ श्रीरामपूर शिवजयंती
मराठा समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त उपस्थित शिवप्रेमी.
----------