अहमदनगर : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त नवनागापूर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे ७० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.
गजाजन कॉलनी येथे दिंडोरी संचलित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र आहे. या केंद्रात विविध कार्यक्रम घेतले जातात. कोरोनानंतर रुग्णालयांना रक्त तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र, कर्मसमर्पण फाऊंडेशन, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. सोमवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेच्या अधिकारी डॉ. संध्या इंगोले, गोकुळ गर्जे, ज्ञानेश्वर मगर, अशोक पवार, अमोल गायकवाड, श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी, कर्मसमर्पण फाऊंडेशन, नवनागापूर ग्रामस्थ उपस्थित होते. १ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू होते. या शिबिरात श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्राचे सेवेकरी, तरुण व नवनागापूर ग्रामस्थांनी सहभाग घेत रक्तदान केले.
................
१४ नवनागापूर रक्तदान