कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथील अशोक रावसाहेब काकडे (वय ४८) हे मंगळवारी (दि. १७) बंधा-यावर अंघोळीसाठी गेले असता पाय घसरुन पडले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, गेले दोन दिवस होऊनही त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर गुरुवारी पहाटे त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.औरंगपूर येथील अशोक रावसाहेब काकडे हे शेतातील काम संपवून अंघोळ करण्यासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील बंधा-यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरुन ते पाण्यात पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक तरुण व अहमदनगर येथील अग्निशमन पथकातील जवान यांच्या मदतीने या बंधा-यामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. बुधवारी रात्री उशीरापर्यंत काकडे यांचा मृतदेह सापडला नव्हता. तसेच पोलीस यंत्राणांकडून वेगवेगळ्या शक्यताही तपासण्याचे काम सुरु होते. परंतु तपास लागला नव्हता. या बंधा-याजवळ घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थ ग्रामस्थ तळ ठोकून होते. गुरुवारी (दि़ १९) पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराच काकडे यांचे पार्थिव पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ते बाहेर काढण्यात आले असून तहसील अधिका-यांच्या उपस्थितीत पोलिसांनी जबाबाची प्रक्रिया पूर्ण करुन काकडे यांच्यावर औरंगपूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अशोक काकडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
औरंगपूर येथील बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तीन दिवसानंतर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:01 PM