शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

संगमनेरात आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

By शेखर पानसरे | Published: February 13, 2024 9:03 PM

ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला. त्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. ॲसिड टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. हा मृतदेह मंगळवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात उड्डाणपुलाखाली आढळून आला.

याबाबत माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलिस कॉस्टेबल आत्माराम पवार हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. मयताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

मयताच्या गळ्यात रुद्राक्ष माळ असून लांब सफेद दाढी आहे. उजव्या हातात लाल रंगाचा धागा बांधला असून त्यात काळे-पांढरे मणी आहेत. वय अंदाजे ५० असेल. गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ, कामगार पोलिस पाटील गणेश म्हस्के यांनी पाेलिसांना प्राथमिक तपासात मदत केली. असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मथुरे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी