तीन तालुक्यात विकले बोगस कांदा बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 1:01 PM
मांडवगण (ता.श्रीगोंदा) येथील खासगी बियाणे कंपनीच्या नावाने बाॅक्स बनवून त्यामध्ये कांद्याचे बोगस बियाणे सील करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अमोल धबागडे (रा. यवतमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने हे बियाणे कर्जत, जामखेड व आष्टी या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीगोंदा : मांडवगण (ता.श्रीगोंदा) येथील खासगी बियाणे कंपनीच्या नावाने बाॅक्स बनवून त्यामध्ये कांद्याचे बोगस बियाणे सील करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अमोल धबागडे (रा. यवतमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने हे बियाणे कर्जत, जामखेड व आष्टी या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकल्याची माहिती समोर आली आहे.आता या प्रकरणाचा तपास श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याकडे देण्यात आला? आहे. शुक्रवारी मांडवगण येथील बोगस बियाणे कारखान्यावर पाेलीस व कृषी विभागाने छापा टाकला होता. यावेळी अमोल प्रकाश धबागडे याला पोलिसांनी अटक केली. पाॅकिंगमधील बियाणे विराट अॅग्रो इनपूट, जालना या कंपनीतून आणले? आहे. कंपनीच्या नावाने बाॅक्स बनविले नाहीत. सुट्टे बियाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केले? आणि ते बियाणे शेतकऱ्यांना विकत होतो, असा जबाब अमोल धबागडे याने पोलिसांना दिल्याचे समजते. मात्र तो यवतमाळहून मांडवगण येथे कसा आला? स्थानिक कोणी यात आहे का? त्याने विराट कंपनीतून बियाणे कसे आणले? त्याच्याडे कृषी विभागाचा व्यवसाय परवाना आहे का? सुट्टे कांदा बियाणे कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केले? अशा अनेक प्रश्नांचा तपास पोलिसांना लावावा लागणार आहे.बोगस कांदा बियाणे पाॅकिंग करून शेतकऱ्यांची फसवणूक करणे हा गुन्हा गंभीर आहे. या प्रकरणाच्या खोलात जाणून तपास करणार आहे, असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.