श्रीरामपूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाच्या परिसरात ४०० केशर आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याने वृक्षारोपण करत श्रमदानाचा आनंद घेतला.
संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांच्या उपस्थितीत उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील परिसरामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण ४३ एकर क्षेत्राचा परिसर विविध प्रकारचे झाडे व फुलांनी बहरला आहे. त्यात केशर आंब्यांची आता भर पडली आहे. यामुळे परिसर अधिकच निसर्गरम्य होईल, असे मीनाताई जगधने यांनी सांगितले. आंबा लागवडीमुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व त्याचबरोबर आर्थिक उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. एन.एस.गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. पोंधे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. ई. डी. औटी उपस्थित होते.
-----------