संगमनेर : ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत विविध गटात नगरने अकरा पारितोषिके पटकावली आहेत. स्पर्धेत राज्यातील सहाशेहूृन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यात अनेक स्पर्धकांनी चित्तथरारक प्रात्यिक्षके सादर केली.
राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशनने महाराष्ट्र योग परिषदेच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धा पडल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.
या स्पर्धेत मुलांच्या लहान गटात अहमदनगरच्या प्रीत बोरकर याने प्रथम, श्रृमल बाणाईत दुसरा व कोल्हापूरच्या युग मेहेत्रे याने तिसरा क्रमांक पटकाविला. पुण्याचा अरविंद सबावत आणि अहमदनगरच्या निबोध पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. याच वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत अहमदनगरच्या तृप्ती डोंगरे, रत्नागिरीच्या स्वरा गुजर व अहमदनगरच्या वैदेही मयेकर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. तेजस्विनी खिंची व गीता शिंदे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली.
मुलांच्या मध्यम गटात पुण्याच्या नितीन पवळे, अहमदनगरच्या जय कालेकर, ओम राजभर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा तर पुण्याच्या सिद्धार्थ डावरे, अहमदनगरच्या रुपेश सांगे, सुमीत बंडाळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. मुलींच्या गटात अहमदनगरच्या मृणाली बाणाईतने पहिला क्रमांक पटकाविला. कोल्हापूरच्या सेजल सुतार व रत्नागिरीच्या तन्वी रेडिज यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा तर नागपूरच्या सुहानी गिरीपूंजे, रचना अंबुलकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, स्पर्धा संचालक सतीश मोहगावकर, बृहण् महाराष्ट्र योग परिषदेचे सरकार्यवाह डॉ. अरुण फोडस्कर यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.
....
वरिष्ठ गटात दातखिळे खर्डे प्रथम
वरिष्ठ गटात मुंबईच्या रुद्र दातखिळेने पहिला क्रमांक पटकाविला. कोल्हापूरच्या घननील लोंढे, मेहुलकुमार जोशी यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा तर गोंदियाच्या रामानंद राऊत, सागर शितकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. मुलींच्या गटात सांगलीच्या क्षितिजा पाटील, रत्नागिरीच्या पूर्वा किनारे, पुण्याच्या आकांक्षा खर्डे यांनी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला. नागपूरच्या कल्याणी चुटे व सृष्टी शेंडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविले.
..
फोटो-२२संगमनेर योगा
..
ओळ-राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत योगाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करताना खेळाडू.