अकोले : भरधाव वेगात जाणा-या पिकअपने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलास जोरदार धडक दिली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
कोतूळ रोडवरील सुगाव फाटा परिसरातील सावतानगरजवळ शुक्रवारी (दि. ५ जून) सकाळी हा अपघात झाला. साई सतिष शिंदे असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
रुंभोडी येथील फूल वाहतूक करणारी सफेद रंगाची पिकअप गाडी नंबर एम.एच.१७, बी.वाय. ५६४७ ही सुगाव-कोतुळ रोडवरून जात होती. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी अपघाताच्या घटनेची नोंद केली आहे.