ब्राम्हणी : दोन वर्षापुर्वी विविध पिकांचा विमा हप्ता भरला असताना बाजरी वगळता कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांची विम्यापोटी रक्कम मिळाली नसल्यामुळे ब्र्राम्हणी परीसरातील शेतक-यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे. संबधित कंपनी, केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.२०१६ मध्ये शेतक-यांनी विमा हप्ता भरला होता. दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांदा, सोयाबीन व अन्य पिकांची नासाडी झाली. प्राध्यान्य बाजरीच्या विम्याला देण्यात येवून भरपाई देण्यात आली. यामुळे संतप्त शेतक-यांनी वेळोवेळी संबधित विमा कंपनी, कृषी विभाग व वरिष्ठ अधिका-यांची भेट घेवून विमा रक्कम मिळण्याची मागणी केली. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आश्वासन देवून अधिका-यांनी मागणीकडे कानाडोळा केला. यामुळे शेतक-यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. डॉ.राजेंद्र बानकर, सचिन ठुबे, उमाकांत हापसे, सतिषराव तारडे, शिवकांत राजदेव आदीसह ६८ शेतकारी न्यायालयात गेले. परीसरात सुमारे पाचशे शेतकरी अद्याप वंचित आहे.
प्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 3:21 PM