राहुरी (जि. अहमदनगर) : एका महिलेने हल्लेखोर बिबट्याला धाडसाने पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी नर्सरी येथे घडली. मीना मधुकर राजुळे (५३) असे या महिलेचे नाव असून शेताच्या बांधावर गवत कापत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत दगडांचा मारा करून, तसेच हातातील खुरप्याचा धाक दाखवून त्याला पळवून लावले.
बिबट्या हा जेमतेम साठ-सत्तर फुटांवर आल्यानंतर मीना यांनी खुरपे त्यावर उगारले. त्यामुळे बिबट्या काहीसा थबकला. हे पाहून त्या पुन्हा बिबट्याच्या दिशेने धावल्या. हा आक्रमक प्रतिकार पाहून बिबट्याने उसाच्या दिशेने धूम ठोकली़ त्यानंतर मीना यांनीही गवताचे गाठोडे डोक्यावर घेऊन घर गाठले. पिंजऱ्यातील बिबट्याला हलविण्यास उंदरगावमधील ग्रामस्थांचा विरोध
केत्तूर (जि. सोलापूर) : उंदरगाव (ता. करमाळा) शिवारातील उजनी जलाशयाच्या पट्ट्यात दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेला बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजºयात रविवारी पहाटे अडकला. मात्र पाळीव प्राण्यांवर झालेल्या हल्ल्यांची शासनाकडून भरपाई मिळत नाही, तोपर्यंत पिंजरा हलवू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे हा पिंजरा हलविता आला नाही. तसेच या भागात आणखी एक बिबट्या आणि दोन पिल्ले असल्याचेही नागरिकांना म्हणणे आहे.गेल्या महिन्यापासून अनेकांनी बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे शेतमजूरही शेतात जायला घाबरतात. मला बिबट्याची आजिबात भीती वाटत नाही़ रविवारी मला पहिल्यांदाच बिबट्या दिसला. मी त्याचा कसून प्रतिकार केला.- मीना राजुळे, शेतकरी.