मध्यंतरी कोल्हार येथील नगर-मनमाड रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने बेलापूरवरून राहुरीच्या दिशेने वळवली होती. त्यातील बहुतांश वाहने ही गंगापूर, मांडवे बंधाऱ्यावरून ये-जा करत होती. या अवजड वाहतुकीमुळे पुलाला भगदाड पडले असावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.
अगोदरच हा पूल जुना व कमकुवत झाला आहे. बंधाऱ्याला ठिकाणी गळतीही लागली आहे. गंगापूर व मांडवे मांडवे येथील नागरिक दैनंदिन दळणवळणासाठी याच बंधाऱ्यावरील पुलाचा वापर करत असतात. भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष घालून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. गंगापूर ते ते लोकनियुक्त सरपंच सतीश खांडके यांनी लोणी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना पत्र पाठवून भरदाड पडलेल्या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
.....
गंगापूर-मांडवे बंधाऱ्यावरून प्रवाशांची कायम वर्दळ असते. पुलाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी, तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद करावा.
- सतीश खांडके, सरपंच, गंगापूर
..
२४राहुरी पूल
...