येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूलच्या माझी विद्यार्थी व्हाॅट्स ॲप ग्रुपमधील मित्रांनी नगर शहरातील गोरगरीब, तसेच जनसेवेसाठी अविरत असलेल्या पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार यांना दिला मदतीचा हात म्हणून सलग दहा दिवस नाश्ता दिला. ग्रुपचे प्रमुख व व्यावसायिक स्वप्नील राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमात जगदीश कोकाटे, कैलास सायंबर, प्रकाश तांबे, विशाल रासकर, श्रीपाद वाघमारे, नितीन जगताप, अर्चना मंडलिक यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा हेतू सांगताना राऊत म्हणाले, दोन हात जोडण्यापेक्षा एक हात मदतीचा म्हणून माझी विद्यार्थ्यांनी हा छोटासा खारीचा वाटा उचलला. गरजू जनतेला अन्नदान करण्यात आले. तसेच जे जनसेवेसाठी अविरत काम करत आहेत त्यांचाही उत्साह वाढवा हाच आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांचे सहकार्य मिळाले.
माजी विद्यार्थ्यांनी दिला दहा दिवस नाश्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:18 AM