शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

सब पैसेके भाई, अपना कोई नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:54 AM

 श्रीमद् शंकराचार्यांनी या श्लोकात एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे, सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादू उभ्या जगावर चालते. पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. ‘अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कर्हिचित। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवै:।’

( भज गोविंदम्-५)     

श्लोक:-५  : यावव्दित्तोपार्जनसक्तस्तावaन्निजपरिवारो रक्त: ।पश्चाध्दावति जर्जरदेहे वार्तां प्रुच्छति कोपि न गेहे ॥५ भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥

 श्रीमद् शंकराचार्यांनी या श्लोकात एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे, सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादू उभ्या जगावर चालते. पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. ‘अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कर्हिचित। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवै:।’

महाभारतात भीष्माचार्य धर्मराजाला म्हणाले होते, सर्व जग अर्थाचे (पैसा) दास आहेत. अर्थ कोणाचा दास नाही. म्हणूनच मी नाईलाजाने का होईना कौरवांच्या बाजूने बांधला गेलो आहे. परमार्थातही धनावाचून काही होत नाही आणि आता तर एक वेगळेच फ्याड आले आहे. ते म्हणजे देवाच्या दरवाज्यावर सोन्याचा मुलामा, देवाचे सिंहासन सोन्याचे, मखर सोन्याचे, विशेष म्हणजे देवाचा मुकुट सोन्याचा आणि तोही १४-१५ किलो वजनाचा.  बरे हे सर्व एक वेळ ठीक आहे, असे समजू. परंतु त्या सोन्याच्या रक्षणासाठी पहारेकरी पाहिजेत. म्हणजे ज्या देवाला आपण ..रक्ष माम परमेश्वर ॥ म्हणायचे त्यालाच संरक्षण हवे. 

ख-या परमार्थाचिया चाडा । कोणी वेचिना कवडा । भुल कैसी पडली मुढा । रोकडा परमार्थ विसरले ॥(लघुवाक्यव्रुत्ती-)

भारतीय संस्कृतीमध्ये  धन हा  दुसरा पुरुषार्थ (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) म्हटले आहे. पैसा मिळवू नये असे नाही. मिळवावा पण तो योग्य मार्गाने मिळवला पाहिजे. श्री तुकाराम महाराज म्हणतात,

‘वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी॥’  

सरळ मार्गाने पैसा कमवावा व योग्य विनीयोग करावा. अवास्तव चैन, हौस भागविण्यासाठी धन आवशक वाटते आणि ते मिळविण्यासाठि वेगवेगळे मार्ग अवलंबिले जातात. बरे हे सर्व कोणासाठी? तर हे सर्व माझ्या कुटुंबासाठी.  ज्यांना मी माझे म्हणतो. त्या माझ्या सगे, सोयºयांसाठी करायचे.

जववरि बरवा चाले धंदा । तववरि बहिण म्हणे दादा॥ 

पैसे असले तरच बहिण सुध्दा मान देते. गरीब भावाकडे जाणार नाही. मायबापे पिंड पाळियेला मायाजन्म मरण ज्या संत संग.. मायेच्या पोटी, लोभाचे पोटी सर्व नातेवाईक जवळ येत असतात. सोयरे, धायरे, दिल्या घेतल्याचे । अंतकाळिचे नाही कोणी ॥तु.म.

जोवरी पैसा तोवरी बैसा ही म्हण खरी आहे. श्रीमंत मनुष्य आला तर त्या ठिकाणी कितीही मोठा विद्वान उपस्थित  असला तरी त्याला मान न मिळता तो श्रीमंत माणसाला मिळतो. व विद्वानाची उपेक्षा होते. 

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा । वेश्यांना मणीहार । उध्दवा अजब तुझे सरकार....  

धनवंताघरि धनचि काम करि॥ तु.म. 

श्रीमंताचे घरी पैसाच काम करीत असतो. पैशामध्ये अशा वेगवेळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. म्हणून पैशाची ताकद ओळखून माणसाने योग्य नियोजन केले तर हाच पैसा त्याला तारणारा ठरणार आहे. त्यातून त्याला चांगले काही करता पण येणार आहे. म्हणूनच श्रीमद् शंकराचार्य म्हणतात..  हे मानवा! जोवर तुझ्यामध्ये धन कमावण्याची शक्ती आहे. तोपर्यंतच तुझ्या घरातील तुझे आप्त तुझ्यावर फार प्रेम करतात. तुझी विचारपूस करतात. पण ! त्यानंतर तुला म्हातारपण आल्यानंतर देह जर्जर झाला.  काम करण्याची शक्ती संपली की घरात तुझा कोणालाही उपयोग नसतो. मग तुझी कोणीही विचारपूस करीत नाहीत. त्यांना तू नको असतो.  तुझा पैसा हवा असतो. 

श्री तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रिये मावळली म्हणती आला बागुल आजा। म्हातारा मनुष्य म्हणजे घरातील नातवांचे खेळणे होऊन बसते. तारुण्यात शक्ती असते. त्यामुळे माणूस म्हणतो की,  लाथ मारीन तिथे पाणी काढीन पण! एकदा का आयुष्य उतरणीला लागले की शरीर थकते. त्यामध्ये रोग प्रवेश करतात. बुध्दि सुध्दा कमजोर होते. विसराळूपणा वाढतो. प्रकृती चांगली रहात नाही. वारंवार वैद्याकडे जावे लागते. शेवटी त्याचाही कंटाळा येतो. आणि औषधेही नको म्हणतो.  अशावेळी त्याची शारिरिक व मानसिक स्थिती ढासळते. मग घरातील लोकांना त्याचा उद्वेग येतो.  त्याला दडपण येते. भितीने ग्रासला जातो. खरे तर अशावेळी त्याला मदतीची, समजून घेण्याची गरज असते. पण! होते सारे उलटेच. त्याला तर कोणी समजून  घेत तर नाहीतच.  पण तो सुध्दा समजून वागत नाही. हे एवढे घडुनही त्याला गोविंदाचे भजन करण्याची बुध्दी होत नाही हे त्याचे दुर्दैव आहे.

जो परिवार त्याला पैसे असतांना प्रेमाने विचारत होता,  तोच परिवार आता त्याला धनाच्या अभावामुळे, शरिराच्या शक्तिहिनतेमुळे त्याच्याशी बोलतही नाहीत. त्यामुळे वार्धक्य न टळणारी गोष्ट आहे.  हे जर आपल्याला माहित असेल तर त्याची तजवीज अगोदरच का करु नये? बालपणापासुनच परमार्थाची सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग जरी प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपला तोल जाणार नाही. सुखदु:खे समे क्रृत्वा लाभा लाभो जया जयौ ॥ हे गीतेचे तत्वज्ञान  समजून घेतले की मग कोणत्याही परिस्थितीत आनंद भंग होत नाही आणि शेवटी फक्त गोविंद नामानेच संधान वाटणार आहे. 

भज गोविंदम्.. भज गोविंदम्...

                                                               -भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले,गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी पाटील, ता.नगर. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक