लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : देशभरातील विविध ठिकाणांहून बळजबरीने उचलून आणून निराधारांना उपाशीपोटी वेठबिगारीला जुंपल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ५ जणांना अटक करण्यात आली. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेलवंडी पोलिसांनी १३ परप्रांतीय वेठबिगारांची सुटका केली आहे. चार पथकांनी १८ व १९ डिसेंबरदरम्यान ही कारवाई केली.
पोलिसांकडून या कारवाईत तालुक्यातील घोटवी, कोळगाव, दाणेवाडी शिवारात आठ ठिकाणी छापे टाकले. बबलू, नरशिम, कल्लू, सिद्धीश्वर, महिला (मुकी), प्रकाश भोसले, वसिम, मन्सूर अली, गणेश, प्रवीण, वीरसिंग, दत्तात्रय कराळे, दादाभाई ठाकरे यांची मुक्तता करण्यात आली आहे. हेे सर्व जण देशातील विविध राज्यातील आहेत.
कामगारांकडून काय काम करून घेत होते?nवेठबिगारांकडून शेळ्या मेंढ्या, गुरे सांभाळणे व शेतातील कामे करून घेतले जात होते.nवेळप्रसंगी त्यांना मारहाण करणे, उपाशी ठेवणे तसेच त्यांच्या खाण्यात गांजा मिसळून त्यांच्याकडून अंगमेहनतीचे कामे करून घेतले जात होते.
माहिती द्या, सुटका करूकोणी मानवी तस्करी करून अनोळखी इसमांना डांबून ठेवून घरातील तसेच शेतातील काम करण्यास भाग पाडत असेल वा भीक मागवत असतील तर पोलिसांना माहिती द्या. - संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक, बेलवंडी