सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गट नंबर १६ व १७/ ३ धोंडीराम दामू वक्ते व महिंद्र वक्ते यांचा तीन एकर ऊस आगीत खाक झाला. या क्षेत्रावरून महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत. या तारा शुक्रवार दुपारी तीन वाजण्याच्या आसपास आग लागली. जाळाचे लोट ऊसावर पडल्याने संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. आग विझविण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अग्निशमन दलाचे बंब येऊन त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु या आगीमध्ये तीन एकर उसासह संपूर्ण क्षेत्रातील पाइप व इलेक्ट्रिक मोटार केबल आदीसह अंदाजे दोन लाख रुपये नुकसान झाल्याचे धोंडीराम दामु वक्ते व महिंद्र वक्ते यांनी सांगितले. नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी दौलत वक्ते, बापुराव वक्ते, वैभव वक्ते, आकार लिंभोरे, किरण गुरसळ, किशोर वक्ते, कर्ण वक्ते, भाऊसाहेब वक्ते, ऋषिकेश वक्ते यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आग विझली नाही.