शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

महिनाभरापासून पिण्याचे पाणी विकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:45 PM

शहरातील मिलिंदनगर परिसरात (प्रभाग ४) तब्बल महिनाभरापासून नागरिकांवर पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे

अशोक निमोणकरजामखेड : शहरातील मिलिंदनगर परिसरात (प्रभाग ४) तब्बल महिनाभरापासून नागरिकांवर पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपालिका प्रशासन, स्थानिक राजकीय पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे येथे पाणी, वीज, रस्ते अशा पायाभूत सुविधांचीही वाणवा आहे.जामखेडला नगरपालिका झाल्यानंतर तरी मिलिंदनगर परिसराची स्थिती पालटेल अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती. मात्र तसे काहीच झाले नाही. येथील पायाभूत प्रश्न ‘जैसे थे’चे राहिले. या परिसरातील अनेक रस्ते अवघे पाच ते आठ फूट रुंदीचे आहेत. त्यातून केवळ एकच वाहन जाऊ शकते. समोरून दुसरे वाहन आले, तर दोन्ही वाहनाचालकांची मोठी कसरत होते. तब्बल महिनाभरापासून या भागात नळाद्वारे पाणी येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठीचे पाणी विकतच (जार) घ्यावे लागत आहे. या प्रभागाला जोडणारा महत्त्वाचा भुतवडा रस्ता ते धर्मयोद्धा चौक रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. काम सुरू असताना जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचे रूपाली पारवे, सोनुबाई गायकवाड यांनी सांगितले.नगरसेविका विद्या वाव्हळ या नगरपरिषदेच्या माध्यमातून एका टॅँकरने चार खेपा करून येथील नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र रस्ते अरुंद असल्याने अनेक नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक बांधकामांच्या साईट बंद असल्याने येथील नागरिकांना रोजगाराचीही वाणवा आहे.दररोज टॅँकरच्या चार खेपा..मिलिंदनगर परिसरात अरूंद रस्ते आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून या प्रभागात सिमेंट रस्ते व भूमिगत गटाराची कामे झाली आहेत. त्यामुळे परिसर बदलत आहे. प्रभागात दररोज टॅँकरच्या चार खेपाद्वारे पाणी दिले जाते, अशी माहिती नगरसेविका विद्या वाव्हळ यांनी दिली.सिंगल फेज मिळालीच नाही..दोन वर्षांपूर्वी सिंगल फेज कनेक्शन मिळावे यासाठी खांब व तार ओढली आहे. परंतु ठेकेदाराला बिल न मिळाल्यामुळे त्याने रोहित्रामध्ये कनेक्शन जोडले नाही. त्यामुळे दूरवर असणाऱ्या ‘थ्री फेज’मधून केबल टाकून कनेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो, असे सुदमती सदाफुले व बबन कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड