अनेक शेतकरी आपल्या शेतात आंतरपीक घेत असतात व यातून उत्पन्न मिळवत असतात. विठे येथील सागर डेरे या शेतकऱ्यानेही शेतात उसाची लागवड केल्यानंतर त्यात आंतरपीक म्हणून कोबीची रोपे उपलब्ध करून लागवड केली. कोबीला सुरुवातीला चांगला भाव मिळत असल्याने आपण हा निर्णय घेतला. सुमारे वीस गुंठे क्षेत्रात आपण कोबीची लागवड केली. हवामानात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे अनेक वेळा कीटकनाशके फवारली. याबरोबरच रासायनिक खतांचा वापर केला. यामुळे कोबीचे पीक जोमाने आले. कोबी तयार होऊ लागला आणि कोबीचे भाव कोसळले. कोबी काढण्याची आणि तो बाजारात नेण्याची मजुरीही फिटेनाशी झाली. यामुळे घरी असणाऱ्या जनावरांना हा कोबी खाद्य म्हणून वापरण्यास सुरुवात केली. अधिक उत्पन्न असल्याने तो जनावरांनाही किती टाकावा हा प्रश्न सध्या निर्माण झाल्याने यातील काही कोबी सध्या शेतातच सडू लागला आहे. त्यामुळे आजपर्यंत सुमारे तीस हजार रुपयांहून अधिक झालेला खर्च व्यर्थ गेल्याचे सागर याने सांगितले.
शेतातच सडू लागला कोबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:18 AM