अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी एमआयडीसी, पारनेर व कोपरगाव येथे वाळूतस्करीवर छापा टाकून ४७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ यामध्ये पाच वाहने जप्त करून सात आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली़एमआयडीसी परिसरात २० लाख ८० हजार रुपये किमतीचे दोन डंपर व आठ ब्रास वाळू जप्त करून ज्ञानेश्वर नामदेव भिंगारदिवे (रा़ कापूरवाडी) व सागर विजय बर्डे (रा़ शिंगवे ता़ नगर) या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पारनेर येथे १६ लाख ३० हजार रुपये किमतीचे विना क्रमांकाचे दोन डंपर, ८ ब्रास वाळू जप्त करत संदीप लक्ष्मण दाते व कैलास गंगाधर सईद (दोघे रा़ वासुंदे) यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कोपरगाव येथे १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करत सचिन संपत शिंदे, गणेश बबन मोरे व राहुल बाळासाहेबआहेर (रा़ तिघे जेऊर पाटोदा) यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मोहन गाजरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष लोढे, विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, संदीप दरंदले, रणजित जाधव, विनोद मासाळकर, प्रकाश वाघ, शिवाजी ढाकणे, कमलेश पाथरुट, मयूर गायकवाड, सागर ससाणे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली़
पोलिसांची वाळूतस्करांविरोधात मोहीम : एमआयडीसी, पारनेर, कोपरगावात वाळूतस्करीवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 5:14 PM