राहाता : बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंदवावा तसेच दलित विरोधी भूमिका घेऊन संपूर्ण मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आमदार गायकवाड यांना अटक करून आमदारकी रद्द करावी, या मागणीचे निवेदन दलित बांधवांनी राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना दिले.
सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दलित बांधवांनी एकत्र येत शिवाजी महाराज चौकातून घोषणा देत पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिले. यावेळी बाळासाहेब गायकवाड, दीपक गायकवाड, सिमोन जगताप, अजय जगताप, सचिन बनसोडे, दिलीप वाघमारे, पप्पू बनसोडे, गणेश निकाळे, राजेंद्र पाळदे, वसंतराव खरात, अनिल गायकवाड, विजय बनसोडे, आकाश बनसोडे, जितू बनसोडे, निखिल बनसोडे, मनोज गायकवाड, योगेश पाळंदे, विलास पगारे, राहुल बनसोडे, शिवम निकाळे, अशोक सोनवणे, बाळासाहेब खाडे, तुषार सदाफळ, अनिल त्रिभुवन, दीपक शिंदे, प्रवीण बनसोडे, सुरज बनसोडे, बाळासाहेब पगारे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, बुलडाणा येथील शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन कुटुंबाच्या वादामध्ये चुकीची भूमिका घेऊन ॲट्रॉसिटी दाखल करणाऱ्यांना झोडून काढण्याची भाषा वापरली आहे. दलित व ॲट्रॉसिटी कायद्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, असे निवेदनात म्हटले आहे.