अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. तालुक्यातील ९५ गावे पेसाक्षेत्रात तर १२७ गावे आदिवासीक्षेत्रात गणली जातात. प्रत्येक गावात किमान चार-दोन आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. तरीदेखील जातीच्या दाखल्याअभावी जागा रिक्त राहतात. ओबीसी प्रवर्गाच्या राखीव जागांवर ''कुणबी'' दाखला मिळवणाऱ्यांची ''कमांड'' दिसत आहे. घोडसरवाडी येथे सहा, शेरणखेल-चैतन्यपूर-जाचकवाडी-कळंब प्रत्येकी एक व भोळेवाडी येथे तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. परिणामी घोडसरवाडीची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. औरंगपूर येथे ७ जागा आहेत. त्यापैकी ६ बिनविरोध, १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसल्याने या प्रवर्गातील एका महिलेने थेट अनारक्षित जागेवरून उभे राहून गावकऱ्यांना निवडणूक घेणे भाग पाडले आहे. परखतपूर गावात ६ जागा बिनविरोध तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. नाचनठाव गावात ६ जागा बिनविरोध तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.
बदगी गावात ५ बिनविरोध तर २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. सुगाव खुर्द गावात ३ बिनविरोध तर ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. रुंभोडी गावात ८ जागा बिनविरोध तर ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. इंदोरी गावात ६ जागा बिनविरोध तर ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. नवलेवाडी गावात ७ जागा बिनविरोध तर ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. पिंपळगाव निपाणी गावात ६ जागा बिनविरोध, ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. मन्याळे गावात ४ जागा बिनविरोध तर एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात असून २ जागा रिक्त आहेत.