अहमदनगर : निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या दैनंदिन खर्चाची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील तपासणी बुधवारी होणार आहे.पहिल्या टप्प्यातील खर्च १३ एप्रिल रोजी सादर करण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उमेदवारांनी १० एप्रिलपर्यंत केलेला खर्च सादर केला. यात सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी १४ लाख ५६ हजार ८३० रूपये दाखवला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी ५ लाख ४२ हजार ५१२ रूपये दाखवला आहे. त्यानंतर इतर पक्ष व अपक्षांचा खर्च साधारण १५ हजार ते ५० हजारांपर्यंत आहे. यातील काही उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांमध्ये तफावत आढळल्याने त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा पाठवल्या आहेत.शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी १८, २२ व २६ एप्रिल अशा तीन टप्प्यात होणार आहे.उमेदवारांनी सादर केलेला खर्च (१० एप्रिलपर्यंत)नामदेव वाकळे ........................ २७ हजार ६११डॉ. सुजय विखे ............... १४ लाख ५६ हजार ८३०संग्राम जगताप ............... ५ लाख ४२ हजार ५१२कलीराम पोपळघट......................... २५ हजार ८००धीरज बताडे .............................. १४ हजार ६३०फारूख शेख................................... अनुपस्थितसुधाकर आव्हाड.......................... २९ हजार ८१९संजय सावंत................................. २५ हजार ७००अप्पासाहेब पालवे....................... २५ हजार ८००कमल सावंत................................. ७९ हजार ७३५दत्तात्रय वाघमोडे .............................. अनुपस्थितभास्कर पाटोळे ............................. १५ हजार ९८७रामनाथ गोल्हार............................ २६ हजार ५४२शेख अबीद हुसेन.......................... ३१ हजार २२०साईनाथ घोरपडे .......................... ३३ हजार २४९ज्ञानदेव सुपेकर............................... अनुपस्थितसंजीव भोर................................. ६३ हजार ४५०संदीप सकट................................ १९ हजार ३९०श्रीधर दरेकर................................. ३३ हजार २०
उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:58 AM