अहमदनगर : दहावी-बारावीचा निकाल तोंडावर आलेला असताना आता आपल्या करिअरच्या वळणावर नेमकी कोणती वाट निवडावी याचे सखोल मार्गदर्शन लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळाल्याने अनेकांसाठी करिअरचे दरवाजे खुले झाले़ लोकमत व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनने योग्यवेळी व एकाच वेळी पालक व विद्यार्थ्यांना एस्पायर एज्युकेशन फेअरद्वारे मार्गदर्शन केले. दहावीनंतर पुढे काय, १२ वी नंतर पुढे काय? अॅनिमेशन क्षेत्रातील करिअर, इंजिनिअरींग प्रवेश कसा करावा असे अनेक विषय घेऊन आयोजिलेल्या विविध सेमिनार्सद्वारे तज्ज्ञांकडून मिळालेली माहितीही उपयुक्त ठरली. तीन दिवस पार पडलेल्या या सेमिनारला पालक व विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाला शहरातील विविध मान्यवरांनीही भेटी देऊन ‘लोकमत’च्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. (प्रतिनिधी) लोकमत व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन दरवर्षीच एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शहरातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शैक्षणिक संस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थी व पालकांनी थेट संवाद साधला. विद्यार्थी व पालकांना या प्रदर्शनामुळे अनेक शिक्षण संस्थांची माहिती एकाच वेळी घेता येते. विविध संस्था विद्यार्थ्यांना देत असलेल्या अभ्यासक्रमांबद्दल, अद्ययावत सुविधांबद्दल माहिती मिळाल्याने संस्थेची निवड करणे सोपे जाते. -डॉ. पी. एम. गायकवाड, संचालक, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनजिल्हाधिकार्यांकडून कौतुक जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी एस्पायर प्रदर्शनाला भेट देऊन शैक्षणिक संस्थाच्या स्टॉलला भेटी दिल्या़ यावेळी संस्थांच्या प्रतिनिधींनी कवडे यांना संस्थेतील अभ्यासक्रम आणि सोयी-सुविधांची माहिती दिली़ एस्पायरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखविणार्या उपक्रमाचे कवडे यांनी कौतुक केले़ एस्पायर प्रदर्शनास अनेक अधिकारी, पदाधिकार्यांनी भेटी दिल्या़आजचे विजेते प्रमोद मुनोत, दिनेश भंडारी, अर्चना राठी, उमेश गावडे.
एस्पायरने दाखविला करिअरचा मार्ग
By admin | Published: June 02, 2014 12:24 AM