कर्जत : राज्यातील ओबीसी समाजाला सर्वच क्षेत्रांत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी सकाळी कर्जत तालुका भाजपच्या वतीने कर्जत-मिरजगाव रस्त्यावर चक्काजामसह धरणे आंदोलन करण्यात आले.
जुन्या तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. याबद्दल राज्य सरकारचा निषेध नाेंदवितो, असे म्हणत तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. कांचन खेत्रे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, दादा सोनमाळी, पप्पूशेठ धोदाड, अनिल गदादे, शेखर खरमरे आदींची भाषणे झाली.
भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, युवा नेते दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब अनारसे, गोपाळ अनारसे, नगरसेविका उषा राऊत, राणी गदादे, नगरसेवक अमृत काळदाते, सतीश समुद्र, डॉ. विलास राऊत आदी उपस्थित होते.
----
२६ कर्जत बीजेपी
कर्जत येथे मिरजगाव रस्त्यावरच भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.