पाथर्डी : कल्याण निर्मल नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ चे रखडलेले काम पूर्ण झाल्याशिवाय बडेवाडी येथील टोलनाका सुरु करण्यात येवू नये, या मागणीसाठी खरवंडी चौकात १ आॅगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकाºयांनी कोरोनामुळे जमावबंदीचा आदेश लागू केला असताना १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अचानक खरवंडी येथे कल्याण-विशाखापट्टम रोडवर रास्ता रोको आंदोलन केले होते.
खरवंडी कासार चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण केला. जमावबंदीचा आदेश दिलेले असताना देखील आंदोलकांनी एकत्र येवून आदेशाचे उल्लंघन केले.
याबाबत दत्तात्रय बडे, किसन आव्हाड, शेलेंद्र जायभाय, दादासाहेब खेडकर, धनंजय पठाडे, बाबासाहेब ढाकणे, महेश दौंड, अनिल दौंड, ऋषिकेश रमेश दराडे यांच्याविरुद्ध पो.कॉ. संदीप गर्जे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.