भाळवणी (ता. पारनेर):- कोरोनाच्या काळात पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विलगीकरण केंद्रात कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दाखल झालेल्या ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाळवणी गावचे ग्रामविकास अधिकारी संपत राधुजी दातीर (वय ४५ वर्षे) यांनी या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब मारुती भोसले, सुनीता बाबासाहेब भोसले, साळूबाई सुरेश भोसले, संदीप सुरेश भोसले, नंदिनी सुरेश भोसले, सुहास सुरेश भोसले, पूजा सुहास भोसले (सर्व रा. भाळवणी, तालुका पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १३ जून ते १५ जून या कालावधीत घडली आहे. कोरोनाचा दुसरा रूग्ण भाळवणीत सापडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
यातील ११ आरोपी हे त्यांचे मुलांसह शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मुंबई ते भाळवणी असा प्रवास करून आदेशाचे उल्लंघन करून कायद्याचा अवमान केला.