कोपरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. कोपरगाव शहरातील विनामास्क विनाकारण फिरणा-या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील माधवबाग परिसरात तोंडाला मास्क न लावता दाटीवाटी करून चौघे दुचाकीवरून विनाकारण फिरत होते. त्यांच्यावर पोलिसांनी मंगळवारी ( दि.१४ जुलै) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला.
श्रीकांत मच्छिंद्र लकारे ( वय २४ ), अक्षय संतोष जाधव ( वय २२), विकी नारायण पंडोरे ( वय २२ ), विनोद सुनील इमाले ( वय २१, चौघे रा. कहारगल्ली, कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. दरम्यान त्याच्याकडील दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.