अहमदनगर : "नागपूर येथील एटीएसने राज्यात काही ठिकाणी दंगली होऊ शकतात, अशी माहिती दिलेली होती. मात्र सरकारनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. राज्यामध्ये ठिकठिकाणी दंगली झाल्या. आगामी निवडणुका जवळ आल्याने हे प्रमाण आणखी वाढेल," अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नगर येथील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सोमवारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "शेवगाव येथील दंगलीमध्ये ज्यांचे काही कारण नाही, त्यांनाही घेण्यात आले असून हे योग्य नाही. याबाबत पोलीस अधीक्षकांशी अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली," असं त्यांनी नमूद केलं. राज्यात जातीय दंगली वाढत आहेत, याबाबत पत्रकारांनी विचारले असता आंबेडकर म्हणाले, की, "राज्यात ठिकठिकाणी दगली होणार आहेत, अशी शक्यता नागपूर एटीएस व्यक्त केलेली होती. परंतु याबाबत सरकारने गांभीर्याने पावले उचलली नाहीत. ठिकठिकाणी दंगली घडलेल्या आहेत आणि यापुढे त्या घडतील, अशी शक्यता आहे," असे आंबेडकर म्हणाले.
आयते मिळाल्याने त्यांची ही भाषा"राजकारणामध्ये आयते मिळाली की अशी भाषा बोलली जाते. कारण कष्ट करून मिळाले मिळालं तर एकमेकांबद्दल आदर असतो ते लोक असे बोलत नाहीत. परंतु ज्यांना आयते मिळते ते अशी भाषा वापरतात," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह इतरांवर केली.तपासाच्या घेऱ्यात असणारेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदारराज्यातील महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठीचे दावे प्रतिदावे सुरू आहेत, याबाबतही त्यांना सवाल करण्यात आला. "महाविकास आघाडीमध्ये जे जे तपासाच्या घेण्यात आहेत ते मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.नगरच्या नामांतराचे स्वागतच पण... "अहमदनगर शहराचे नाव अहिल्यादेवी होळकर केले, हे काही गैर नाही. परंतु त्यांची एक एकच बाजू समोर आणली जात आहे. त्यांची दुसरी बाजू ही समोर यायला हवी त्या लढाऊ वृत्तीच्या होत्या. तसेच त्यांचे प्रशासकीय व्यवस्थापन देखील अत्यंत उत्कृष्ट होतं. त्यांचा हा इतिहास देखील समोर आणायला हवा,"अशी आंबेडकर म्हणाले.