शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महापरीक्षा पोर्टलमधून परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज मिळेना; तलाठी भरती सापडली वादात  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 2:48 AM

Exam News : शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसून घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे.

अहमदनगर - भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी बसल्याचे आढळून आले आहे. शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसून घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे. या पोर्टलमार्फत जुलै २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली. पात्र ठरलेल्यांना २६  जिल्ह्यांत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ८४ जागांवर नियुक्ती देण्यासाठी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी २३६ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यामध्ये १४ उमेदवारांच्या प्रवेश अर्जातील व परीक्षागृहातील स्वाक्षरी आणि छायाचित्रात तफावत आढळून आली. त्यामुळे या २३६ उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शासनाच्या महाआयटी विभागाकडे मागितले. मात्र ते उपलब्ध झालेले नाही. भरतीचे काम पाहिलेल्या यूएसटी ग्लोबल या खासगी कंपनीने केवळ चौदा संशयित उमेदवारांचा अहवाल दिला आहे. त्यात पाच उमेदवारांचे फुटेजच आढळले नाही, ७ ऑक्टोबरला महाआयटी विभागाच्या संचालकांना पुन्हा पत्र पाठविले. मात्र ही माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यानच्या काळात  द्विवेदी यांची बदली झाली आहे. एमपीएससीने बंदी आणलेले काही उमेदवार गुणवत्ता यादीत आले आहेत. नगरला आक्षेपार्ह आढळलेले १४ उमेदवार हे एकाच प्रवर्गाचे व एकाच जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरexamपरीक्षा