: सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन व शेेेेेतकरी दिन आश्वी परिसरातील गावांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
आश्वी जिल्हा परिषद गटातील आश्वी बुद्रूक, आश्वी खुर्द, शिबलापूर, चिंचपूर, पिंप्रीलौकी आजमपूर, खळी, औरंगपूर या गावांमध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती व शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांच्या आश्वी बुद्रूक येथील जनसंपर्क कार्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य ॲड. रोहिणी निघुते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवरा बँकेचा आश्वी शाखेत बँकेचे अध्यक्ष अशोकराव म्हसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशोर जर्हाड, भाऊसाहेब जर्हाड, अजय ब्राह्मणे, ज्ञानेश्वर वाकचौरे, अशोक जर्हाड उपस्थित होते. चिंचपूर येथे विखे कारखान्याचे संचालक कैलास तांबे, आश्वी खुर्दमध्ये प्रवरा बँकेचे संचालक बाळासाहेब भवर, डॉ. दिनकर गायकवाड, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच अनिल मांढरे, शिबलापूर येथे विखे कारखान्याचे संचालक जहुरभाई शेख, प्रकाश शिंदे, आण्णासाहेब म्हस्के यांनी पद्मश्रीच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.