....
वृक्षप्राधिकरण समितीवर भाजपाचा वरचष्मा
अहमदनगर: महापालिका वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यपदी भाजपचे नगरसेवक महेंद्र गंधे व सभागृहनेते रवींद्र बारस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेविका मीना चोपडा, सेनेच्या नगरसेविका मंगल लोखंडे, पल्लवी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपायुक्त यशवंत डांगे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नियुक्तीबाबतचा आदेश नुकताच काढला आहे.
..................
चांदबिबी महाल परिसरात १०० औषधी वृक्षांची लागवड
अहमदनगर: येथील ओपन आर्म्स संघटनेच्या पुढाकारातून चांदबीबी महाल परिसरामध्ये १०० औषधे वृक्षारोपणाच्या लागवडीचा शुभारंभ संघटनेच्या अध्यक्ष शुभम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष कृष्णा सरोदे, खजिनदार परेश मुनोत, गणेश शिंदे, आकाश खेडकड, शुभम गुळसकर, मयूर राऊत, सलमान जावेद शेख, पंकज हरबा, प्रतीक नानेकर आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
.............
आनंदधाम येथे लसीकरण शिबिर
अहमदनगर: आनंदधाम येथील जैन साधू-साध्वी यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस देण्यात आला. यावेळी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, युवाचार्य महेंद्र ऋषीजी म.सा. आलोक ऋषीजी म.सा. जितेंद्र ऋषीजी म.सा. अचाल ऋषीजी म.सा. अक्षय ऋषीजी म.सा., अमृत ऋषीजी म.सा. नरेंद्र बाफना, संजय ताठेड, अनिल दुगड, संतोष बोथरा, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बॅंकेचे संचालक संजय चोपडा, नगरसेवक विपुल शेटिया आदी उपस्थित होते.
...........................