राहुरी : राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात रोटरी ब्लड बँकेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीने अनाठायी खर्चाला फाटा देत कोरोनाविषयक शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून विविध सामाजिक उपक्रम हाती घेत शिवजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा केला. प्रारंभी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरुण तनपुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बोरुडे यांनी केले.
यावेळी डॉ. जयंत कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र आढाव, आदिनाथ तनपुरे, बंडू घोरपडे, संतोष आघाव, गंगाधर सांगळे, सावतामाळी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, प्रहारचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे, डॉ. भारत पैठणे, आप्पासाहेब शिरसाठ, संजय संसारे, अनिल जगधने, संतोष वाघमारे, सतीश सोनावणे, दिनेश वराळे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे शिवाजीराव डौले, राहुल शेटे, प्रकाश पवार, रमेश बोरुडे, मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे, अनिल गावडे, अतुल तनपुरे, सुहास दुधाडे, किशोर म्हसे, सुनील तनपुरे, सचिन बोरुडे, शरद म्हसे, बाळकृष्ण वाघ यांनी परिश्रम घेतले.