मिरजगाव : गेल्या दोन महिन्यांपासून सीना नदीच्या पाणलोटात पडणाºया पावसाने रविवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटाने सीना धरण ओव्हरफ्लो झाले. जिल्ह्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वप्रथम सीना धरण ओव्हरफ्लो होण्याचा विक्रम तब्बल ३५ वर्षानंतर नोंदला गेला आहे.
२४०० दशलक्ष घनफूट भरून ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यातून ५५.५६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सीना नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे
दोन वषार्नंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दोन वषार्पूर्वी हे धरण २०१८ रोजी भरले होते. सीना धरण हे जेव्हा जेव्हा ओव्हरफ्लो झाले ते आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात. परंतू गतवर्षी जिल्ह्यातील सर्वच धरणाची पाणीपातळी ५० टक्क्यांच्या आत असतानाच सीना धरणाने पहिल्यांदाच प्रथम ओव्हरफ्लो होण्याच्या विक्रम केला आहे.
सीना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर धरणाच्या उजव्या कालव्याव्दारे कर्जत तालुक्यातील २१ गावातील ७६७२ हेक्टर तर डाव्या कालव्याव्दारे आष्टी तालुक्यातील तीन गावातील ७७३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. त्यामुळे लाभक्षेत्रात शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.