अहमदनगर : आजी, माजी सैनिक पत्नीला सोयीची पदस्थापना देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वजीत माने यांना असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक विनंती बदलीपासून सैनिक पत्नीला वंचित ठेवल्याची तक्रार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे करण्यात आली आहे़ शनिवारी विखे यांनी शेलार यांच्याशी चर्चा करुन यातून तोडगा काढण्याची गळ घातली़जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी शनिवारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन चर्चा केली़ त्यानंतर विखे, घुले, वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेतील बदल्यांमधील अनागोंदी शिक्षणमंत्री शेलार यांच्यासमोर मांडली़ तसेच बदल्यांबाबत निवेदन देऊन अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली़ या निवेदनात म्हटले आहे, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पार पडलेली आहे. बदली प्रक्रियेबाबत बºयाच शिक्षकांनी तक्रारी केल्या आहेत.आजी / माजी सैनिक पत्नीला आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना देताना प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला व ते अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले़ मात्र, नगर जिल्हा परिषदेत सीईओ माने यांनी माजी सैनिकाच्या पत्नीस सोयीच्या पदस्थापनेपासून वंचित ठेवले आहे़ संगणकीय प्रणालीने संवर्ग १ ते संवर्ग ४ च्या बदल्या झाल्यानंतर पदस्थापना न मिळालेले शिक्षक, मागील वर्षीच्या बदल्यांमध्ये रॅण्डम राऊंडला गेलेले शिक्षक, न्यायालयीन आदेश असलेले शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेले शिक्षक यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना होते़जिल्हा स्तरावर या पदस्थापना देताना आजी, माजी सैनिक पत्नी, गरोदर महिला, स्तनदा माता यांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सोयीनुसार पदस्थापना द्यावी असे सरकारचे निर्देश आहेत़ मात्र, हे निर्देश माने यांनी पायदळी तुडविल्याचे म्हटले आहे़ तसेच ग्रामविकास विभागातील सर्वच संवर्गातील जिल्हांतर्गत बदल्यामध्ये महिला कर्मचा-यांना प्राधान्य मिळावे, अशी मागणीही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे़प्रहार दिव्यांगचे सीईओंना निवेदनअरुणा घाडगे यांची कोळगाव केंद्रात सोयीच्या ठिकाणी त्वरित बदली करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अध्यक्षांनी विनंती करुनही ऐकले नाही. माजी सैनिकाच्या कुटुंबाचाही प्रशासनाला आदर राहिलेला नाही. त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली न झाल्यास कोळगाव केंद्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पोकळे यांनी दिला आहे.
सीईओ माने यांची मंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:45 PM