शेवगाव : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच आदी संघटनाच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
संजय नांगरे म्हणाले की, केंद्र सरकारने चारही शेतकरी आंदोलनस्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ आदींचा पुरवठा बळाचा वापर करून तोडण्यात आला. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.