वादविवाद स्पर्धेत प्रणाली पाटील आणि गणेश लोळगे यांच्या संघाने प्रथम क्रमांक, गोविंद अंभोरे आणि आशिष साडेगावकर (वृत्तपत्र आणि जनसंवाद विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) या संघाने द्वितीय, तर ऋषभ चौधरी आणि अनिकेत डमाळे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत दिपक कसबे आणि चैतन्य बनकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. रेवन्नाथ भोसले आणि महेश उशीर (सदगुरु गगनगिरी महाराज महाविद्यालय, कोपरगाव) या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. सामाजिक व राजकीय विषयावरील सर्वोत्कृष्ट वक्त्याचा करंडक चैतन्य बनकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मिळवला. स्त्री विषयासाठीचा करंडक रेसिडेन्शियल ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा गंगावणे हिने मिळवला. प्रज्वल नरवडे, साईनाथ महादवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड कारभारी उगले, तर अध्यक्ष म्हणून जिल्हा मराठा संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे उपस्थित होते. स्पर्धेसाठी राहुल विद्या माने, ज्ञानेश्वर जाधवर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बी. बी सागडे यांनी केले. या प्रसंगी निर्मलाताई काटे, सीताराम खिलारी, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंधरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. के. मोटे उपस्थित होते. डॉ. ज्ञानदेव कोल्हे यांनी आभार मानले.
------------
फोटो - १३न्यू आर्टस