शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भंडारदऱ्यात काजव्यांची ‘चमचम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 2:10 AM

आठवडाभरात पावसाचे संकेत : १५ जूनपर्यंत पर्यटन हंगाम

भंडारदरा (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात दरवर्षी राज्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना भुरळ घालणारी काजव्यांची ‘चमचम’ सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून काजवे चमकू लागल्याने आठवड्यात पावसाचे आगमनाचे संकेत मिळत आहेत.भंडारदरा परिसरातील अभयारण्य म्हणजे निसर्ग व जैव विविधतेचा मोठा खजिना आहे. दरवर्षी अभयारण्यात वैशाख महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे २५ मे ते १५ जून या कालावधीत हे काजवे दिसतात. यंदा मात्र पावसाचे आगमन उशिरा असल्याने त्यांचे दर्शन दोन दिवसांपासून होत आहे.

कुमशेत, पांजरे, उडदावणे परिसरात सध्या ते कमी संख्येने दिसत असले तरी पुढील पाच सहा दिवसांत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. हे काजवे सादडा, हिरडा, बेहडा, बोंडारा या वृक्षावरच दिसतात. कारण त्यांची साल खडबडीत व काजव्यांच्या प्रजननासाठी पूरक असते. नर मादी एकमेकांना आकर्षित करतात. त्यांच्या शेपटीकडील भाग पाºयासारख्या द्रवाने चमकतो. हा द्रव फक्त महिनाभर त्यांच्या शरिरात तयार होतो. नंतर याच वृक्षात ते आपली अंडी व पिलांना जन्म देतात.