शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर
2
'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?
3
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
4
शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर
5
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
6
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
7
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
8
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
9
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
10
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
11
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
12
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
13
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
14
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
15
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
16
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
17
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
18
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
19
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
20
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 4:37 PM

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रविवारी (४ आॅगस्ट) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली.

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रविवारी (४ आॅगस्ट) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यंदाच्या पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याची ही पाचवी घटना आहे.सिन्नर ते खेड असे चौपदीकरण करताना चंदनापुरी घाटात डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. डोंगर फोडण्यासाठी सुरूंगाचा वापर झाल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पाणी झिरपल्याने मोठे दगड सुट्टे होवून सुरक्षा जाळ्यांमध्ये अडकले होते. या जाळ्यांवर ताण येवून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर १२ जुलैला रात्री साडे अकराच्या सुमारास जाळ्यांसह दरड कोसळली होती. ही दरड हटविण्यात आली आहे. मात्र २३ दिवसांपासून काही अंतरावर हा रस्ता बंदच आहे. आज पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर