अहमदनगर : बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त असते. त्यामुळे मुलांना परीक्षेत त्रास होऊ नये म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेत बदल करून त्या सकाळी लवकर घ्याव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या शालांत परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती या पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समीर शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, कैलास जाधव, सोपानराव कळमकर, संजय भुसारी, शंकर भिवसने, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, अमृता गायखे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी केली आहे.