भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा

By अरुण वाघमोडे | Published: May 15, 2023 05:01 PM2023-05-15T17:01:23+5:302023-05-15T17:01:53+5:30

नगरकरांसमोर जाहीररीत्या रस्त्यांच्या कामांची इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली.

Charge corruption cases, or self-immolation; Congress city district president's warning | भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा

अहमदनगर: माहिती अधिकारात नगर शहरातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उघड झालेल्या बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. २३ मे पर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर काळेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेतली.

नगरकरांसमोर जाहीररीत्या रस्त्यांच्या कामांची इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली. यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, प्रवीण गीते, निजाम जहागीरदार, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, प्रणव मकासरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, सोफियान रंगरेज, शंकर आव्हाड आदी उपस्थित होते.

याबाबत दिलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की, रस्त्यांच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे केल्यामुळे बनावट रिपोर्ट जोडण्यात आले. जे जोडले ते सुद्धा प्रत्यक्ष पाहणी न करता बनावटरित्या तयार केलेत. बनावट रिपोर्ट देणारे, निकृष्ट काम करणारे ठेकेदार व पडताळणी न करता ते स्विकारून त्या आधारे कोट्यावधींची देखके अदा करणारे सर्वच दोषी असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. १९ मे रोजी सकाळी १०.३० ते १.०० वाजेपर्यंत मनपाच्या अभियंत्यांनी रस्त्याची गुणवत्ता तपासावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा काळे यांनी दिला आहे.

Web Title: Charge corruption cases, or self-immolation; Congress city district president's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.