शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

‘तुकाई’प्रकरणी शिंदेंकडून फसवणूक : कैलास शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:50 PM

तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत

कर्जत : तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत. त्यामुळे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.शेवाळे म्हणाले, कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायक ठरणाºया तुकाई चारीच्या मागणीला फाटा देत पालकमंत्री राम शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन योजना केली. या योजनेची संकल्पना ही पाईपद्वारे तलावात पाणी नेण्याची असल्याने लिफ्टपासून तलावात पाणी मोठ्या पाईपद्वारे जाणार असल्याने मधल्या भागातील शेतकºयांना याचा कसलाही फायदा होणार नाही. मात्र खर्च शेतकºयांच्या माथी मारला जाणार आहे. जनतेची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता लाभक्षेत्रातील गावांसाठी चारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकºयांची फसवणूक करणे थांबवावे.कर्जत तालुक्यात अवर्षण प्रवर्ग क्षेत्रातील गुरव पिंपरी, मिरजगाव, कोंभळी, चिंचोली काळदात, टाकळी खंडेश्वरी यांच्यासह २१ गावांना वरदान ठरू शकणारी तुकाई चारी होण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. या परिसरातील बाळासाहेब सूर्यवंशी दोन वर्षांपासून तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २ हजार हेक्टरला उपयोगी ठरू शकणारी तुकाई चारी व्हावी या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावत अवघ्या ५९९ हेक्टरला फक्त लाभ देणारी व पाईपलाईनद्वारे पाणी तलावात सोडणारी तुकाई उपसा सिंचन योजना जलसंधारण विभागाकडून जाहीर केली आहे.जलसंपदा विभागामार्फत तुकाई चारी पद्धतीच्या योजना राबविणे आवश्यक असताना सिंचन योजनेसाठी जलसंधारण विभागाचा निधी वापरत जनतेची फसवणूक केली जात आहे.तुकाई योजना ही चारीद्वारेच व्हावी अशी लाभार्थी शेतकºयांची मागणी आहे. २१ गावातील २हजार हेक्टरला त्यांचा फायदा होऊ शकणाºया चाºयांसाठी १५ कोटी रूपये खर्च प्रस्तावित केला होता. मात्र इस्त्रायल पद्धतीची उपसा योजना करण्यासाठी ६१ कोटी रूपये देण्याची घोषणा केली गेली. या चौपट होणाºया खर्चात फक्त तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार असून त्याचा लाभ तलावाच्या आसपासच्या शेतकºयांनाच होणार आहे.याशिवाय अवघ्या १०० दलघफू पाण्यात किती तलाव भरले जाणार आहेत? तुकाई चारीच्या नावाखाली परिसरातील लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे षडयंत्र लोकप्रतिनिधीद्वारे आखले जात आहे. या योजनेद्वारे ५९९ हेक्टर क्षेत्रास लाभ होईल हे कसे काढले? यासह यामध्ये कोणते गाव व क्षेत्र असणार आहे? याचा खुलासा अधिकाºयांना मागणार असल्याचे अ‍ॅड. शेवाळे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत