शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी शुक्रवारी ( दि.५) ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, विभागप्रमुख डॉ. एम. एस. मोरे, समन्वयक प्रा. पी. टी. त्र्यंबके आदी उपस्थित होते.
डॉ. वडगावकर म्हणाले, सध्या ग्लोबल वार्मिंग,
पर्यावरणविषयी असलेल्या समस्या, प्रदुषण यासारख्या अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत. रसायनशास्त्र विषयाचा उपयोग करुन काही नाविण्यापूर्ण बदल केल्यास आपल्याला काही समस्या नक्कीच कमी करता येतील. व्याख्यानमालेच्या दुस-या दिवशी मध्यप्रदेश येथील डॉ. संजय भावसार यांनी विद्यार्थ्यांना कंपनीत असलेल्या नोकरीच्या संधी याविषयी माहिती दिली. रसायनशास्त्र विषयाची कपंनी, संशोधन केंद्र, शैक्षणिक क्षेत्र, परदेशातील नोकरीच्या संधी, कंपनीतील नियम तसेच कंपनीत काम करताना कोणकोनत्या गोष्टींचे काटेकोर पालन केले पाहीजे याविषयी माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले.
कॅनडा येथील डॉ. अमोल जाधव या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले.
प्रास्ताविक डॉ. एम. एस. मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. जे. देशमुख यांनी केले. डॉ. आर. एस. ओझा, डॉ. एन. डी. फटांगरे, एम. आर. भोये, एस. आर. श्रीमंदिलकर, ए. जी. कडलग, एस. जी. डेंगळे व डॉ. एस. सी. भिसे यांनी सहभाग घेतला.