प्रकाश महालेराजूर : नगर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आणि नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघरच्या रांगेतील उडदावणे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ टँकर आला की सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर अबालवृद्धांची एकच झुंबड उडत असून, अवघ्या २० मिनिटात विहीर कोरडीठाक होत आहे़अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कळसूबाई शिखराच्या पायथ्याला उडदावणे हे गाव आहे़ पावसाळ्यात नजरेत भरणारा, जलोत्सव, सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून फेसाळत कोसळणारे धबधबे, एका मोसमात तीन ते चार वेळा होणारी अतिवृष्टीसाठी हा परिसर ओळखला जातो़ घाटघर परिसरात एकाच दिवशी ८ ते ११ इंच पाऊस पडतो. मात्र डोंगरी भाग असल्याने पडणारा पाऊस वाहून जातो आणि उन्हाळ््यात परिसर कोरडाठाक बनतो.डोंगरावरू पायरवाडी, गांगडवाडी, फणसवाडी, कांदनवाडी या चार वाड्यावस्त्यांची मिळून गावात सुमारे २३०० लोकसंख्या आहे़ गावाला पाण्यासाठी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर असून, येथून नळाद्वारे गावासह वाड्यावस्त्यांवर पाणी पुरवठा केला जातो़ मात्र, फेब्रुवारी महिना संपला की वाड्या वस्त्यांसह गावाला टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते़सार्वजनिक विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते़ त्यानंतर हंड्याद्वारे गावातील महिला, मुले, वृद्ध पाणी भरण्यासाठी एकच गर्दी करतात़ त्यामुळे अवघ्या २० मिनिटात टँकरचे पाणी संपून विहिरी कोरडी बनते़ भंडारदरा धरण पायथ्याला घेऊन झोपणाºया गावाला ऐन उन्हाळ्यात दरवर्षीच कडाक्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागते़त्यामुळे गावासाठी थेट धरणावरुन पाणी योजना करण्याची मागणी होत आहे़रोज होतात तीन खेपाउडदावणे येथे दररोज शासनाच्या टँकरच्या तीन खेपा तीन ठिकाणी टाकल्या जातात. सकाळी दोन तर दुपारनंतर एक असे या खेपांचे वेळापत्रक तयार करण्यात आले़टँकर आला की संपूर्ण गाव हांडे, पाण्याच्या बादल्या घेऊन विहिरीवर पळत सुटतात़अतिवृष्टीचे गाव असूनही उपाय योजनांअभावी उन्हाळ्यात टँकरच नशिबी असल्याची प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करतात़