शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘लोकमत’च्या आॅनलाइन वृत्तानंतर छिंदमचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 6:18 PM

आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले, तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरपदापर्यंत पोहोचलाच नव्हता. दरम्यान याबाबत लोकमतच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रकाशित होताच भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आणि दुपारी साडेतीनवाजता छिंदम याचा राजीनामा महापौरांकडे पाठविण्यात आला.

अहमदनगर : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले, तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरपदापर्यंत पोहोचलाच नव्हता. दरम्यान याबाबत लोकमतच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रकाशित होताच भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आणि दुपारी साडेतीनवाजता छिंदम याचा राजीनामा महापौरांकडे पाठविण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शुक्रवारी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्याच्या उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खा. दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. छिंदम याने दिलेल्या राजीनाम्याची प्रतही माध्यमांकडे पाठविण्यात आली होती. मात्र छिंदम याने पदाचा राजीनामा दिला असल्याचे शहर जिल्हाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. प्रत्यक्षात छिंदम याने महापौरांच्या नावे राजीनामा सादर करणे आवश्यक होते. छिंदम याने दिलेला पदाचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते. २४ तास उलटून गेल्यानंतरही शनिवारी महापालिकेत राजीनामा धडकलाच नाही. याचे सविस्तर वृत्त लोकमतने आॅनलाइन प्रकाशित केल्यानंतर खासदार गांधी यांनी छिंदम याचा राजीनामा महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यालयाकडे पाठवून दिला. दरम्यान महापौर नगरमध्ये नसल्यामुळे या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमAhmednagarअहमदनगरBJPभाजपाDilip Gandhiखा. दिलीप गांधी