शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

मुख्याधिकारी-नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 7:24 PM

शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. कारवाई रोखण्यासाठी संबंधित व्यावसायिकाने थेट मुख्याधिका-यासह एका नगरसेवकाने आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप नगराध्यक्षांसमोर केल्याची क्लिप व्हायरल झाल्याचे पडसाद या सभेत उमटले.

ठळक मुद्देपडसाद : श्रीरामपूर नगरपालिका सभेत गदारोळ

श्रीरामपूर : शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. कारवाई रोखण्यासाठी संबंधित व्यावसायिकाने थेट मुख्याधिका-यासह एका नगरसेवकाने आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप नगराध्यक्षांसमोर केल्याची क्लिप व्हायरल झाल्याचे पडसाद या सभेत उमटले.अशा प्रकारामुळे पालिकेची बदनामी होत असल्याचे म्हणत विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी याबाबत सभेत आवाज उठविला. सत्ताधा-यांनीदेखील या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.कामकाज सुरू होताच मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादाच्या ठिणग्या पडल्या. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाचे पडसाद यावेळी पाहावयास मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजी चौकात बसविणे, स्मशानभूमीतील हनुमान मंदिराच्या ट्रस्ट नोंदणीसाठी ना हरकत दाखला द्यावा, दैनंदिन कर वसुली, मुरमाची बिले काढणे, पथदिव्यांची निविदा, गोंधवणी रस्त्याचे रखडलेले काम या प्रमुख विषयांवरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली.पालिकेने एका व्यावसायिकाचे अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रणा पाठविली. मात्र, थोड्याच वेळात कारवाई थांबली गेली. हे प्रकरण नगराध्यक्षा आदिक यांच्यापर्यंत गेले. त्यावेळी मुख्याधिकारी मोरे, एक नगरसेवक व पालिकेच्या अधिकाºयांना आपण पाच लाख रुपये दिल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला. त्यानंतर शहरात सोशल मीडियावर हे प्रकरण गाजले. त्यातून पालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे विरोधी नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मुख्तार शाह यांनी सांगितले. सत्ताधारी नगरसेवक अंजूम शेख, राजेंद्र पवार, शामलिंग शिंदे यांनीदेखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. कुणा एकाचे अतिक्रमण न काढता यापुढे अतिक्रमणे होणार नाही, याची दक्षता मुख्याधिका-यांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या वादावर नगराध्यक्षा आदिक व मुख्याधिका-यांनी न बोलणेच पसंत केले.गोंधवणी रस्त्यावर आमदार काबळे, तसेच डझनभर नगरसेवक राहतात. मात्र या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याप्रश्नी नगरसेवक शामलिंग शिंदे यांनी पोटतिडकीने रस्त्याचे काम सुरू करावे, अशी विनंती केली.छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातचछत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तयार असून, तो शिवाजी चौकातच बसविला जाईल, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सभागृहात सांगितले. मात्र, विषयपत्रिकेवर त्याचा समावेश नसल्याचा मुद्दा नगरसेवक फंड यांनी उपस्थित केला. यावर विरोधकांनी राजकारण क रू नये, पुतळा तेथेच बसविला जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. नगरसेवक अंजूम शेख यांनी सर्व नगरसेवकांची या कामास संमती असून, कायदेशीर बाबी तपासून घेण्याची सूचना केली. जेथे परवानगी मिळेल त्या ठिकाणी पुतळवा बसवावा, असे ते म्हणाले. मात्र त्यास विरोधी व सत्ताधा-यांनी आक्षेप घेत आक्रमक होऊन घोषणाबाजी केली.