अहमदनगर : केडगाव हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दहा जणांची सीआयडीकडून पुनर्चौकशी होणार आहे़ याबाबत जिल्हा न्यायालयाने सीआयडीची विनंती मान्य करत चौकशीची परवानगी दिली आहे़केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली़ या प्रकरणी विशेष पथकाने आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास उर्फ बी़एम़ कोतकर, रवि खोल्लम, विशाल कोतकर, संदीप गिºहे, महावीर मोकळे, बाबासाहेब केदार व भानुदास कोतकर या दहा जणांना अटक केली़ विशेष पथकाकडून हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला़ पोलीस उपाधीक्षक अरूणकुमार सपकाळे या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत़ सपकाळे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस़एस़ पाटील यांच्याकडे शनिवारी (दि़२) केडगाव हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दहा जणांची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती़न्यायालयाने सीआयडीची विनंती मान्य केली आहे़ न्यायालयीन कोठडीत असलेल्या दहा जणांपैकी काही औरंगाबाद तर काही जण नाशिक कारागृहात आहेत़ सीआयडी पथकाला कारागृहात जाऊन आरोपींची चौकशी करावी लागणार आहे़----------------कोतकरचा ‘नार्को’ला नकारच्केडगाव हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने नार्को टेस्ट घेण्यास नकार दिला आहे़ कोतकर हा सध्या नाशिक कारागृहात आहे़ पोलिसांनी गुंजाळ याच्यासह कोतकर याची नार्को टेस्ट घेण्यास न्यायालयाकडे परवानगी मागितली होती़ कोतकर याने मात्र नकार देत आपले लेखी म्हणणे शनिवारी न्यायालयात सादर केले आहे़ याबाबत पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे़
केडगाव हत्याकांडप्रकरणी अटकेतील दहा जणांची सीआयडी करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:41 PM