येथील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शुक्रवारी (दि. ७) कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सीताराम राऊत, महेंद्र गोडगे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, सदस्य विष्णुपंत रहाटळ, बेबी थोरात, बी. आर. चकोर, सुरेश थोरात, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचोरिया, कृषी अधिकारी प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, घरात एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर त्याचे संपूर्ण कुटुंब बाधित होते. मग अवस्था वाईट होते. त्यामुळे कुणीही निष्काळजीपणा करू नका. ऑक्सिजन पुरवठा व मूलभूत औषधे पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाने जागरूक होत आपल्या परिसरात, आपल्याजवळ कुणालाही कोणत्याही आजाराची काही लक्षणे आढळली तर त्याचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांचे लसीकरण करताना गर्दी होणार नाही. याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात कोरोनामुक्त गावाकडे प्रत्येक गावाची वाटचाल होण्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.