अहमदनगर : नगर तालुक्यात कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना विविध योजनेचे धान्य वितरीत करण्यात येत आहे. अंत्योदय योजनेमध्ये प्रतिकार्ड 26 किलो गहू ( प्रतिकिलो २ रुपये प्रमाणे) व तांदूळ प्रतिकार्ड ९ किलो (दर प्रतिकिलो ३ रुपये प्रमाणे) व तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ व तसेच माहे एप्रिल, मे, व जून २०२० या तीन महिण्याची प्रतिकार्ड प्रतिमहिणा एक किलोप्रमाणे (एप्रिल व मे 2020 करीता दोन किलो चना डाळ व जून करीता एक किलो तूर डाळ) तीन किलो डाळ एकत्रितपणे देण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेमध्ये समाविष्ट असणाºया शिधापत्रिकाधारकास प्रति व्यक्ती तीन किलो गहू त्याचा दर प्रतिकिलो दोन रुपये प्रमाणे व तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो त्याचा दर प्रतिकिलो तीन रुपये प्रमाणे व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ तसेच माहे एप्रिल, मे व जून 2020 या तीन महिण्याची प्रतिकार्ड प्रतिमहिणा एक किलोप्रमाणे (एप्रिल व मे २०२० करीता दोन किलो किलो चनादाळ व जून २०२० करीता एक किलो तूर डाळ) तीन किलो डाळ एकत्रितपणे देण्यात येणार आहे.
एपीएल केशरी शिधापत्रिका योजना एपीएल केशरी शिधापत्रीका योजना म्हणजे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत (अंत्योदय/प्राधान्य कुटूंब योजना) समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल केशरी शिधापत्रीकाधारकांना रेशनकार्डमधील प्रति व्यक्ती तीन किलो गहू त्याचा दर प्रतिकिलो ८ रुपये प्रमाणे व तांदूळ प्रति व्यक्ती २ किलो त्याचा दर प्रतिकिलो १२ रुपयये प्रमाणे अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. सदरचा लाभ हा फक्त नगर तालुक्यातील केशरी शिधापत्रिधारकांना देण्यात येणार आहे.
आत्मनिर्भीर भारत योजना कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करणेसाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निदेर्शानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रीका धारकांना माहे मे व जून २०२० या दोन महिण्याचे प्रति व्यक्ती प्रति महा ५ किलो प्रमाणे एकत्रीत १० किलो मोफत तांदूळ व मे व जून २०२० या दोन महिण्याचे प्रति कुटूंब प्रति महा एक किलो प्रमाणे एकत्रीत २ किलो चना स्वस्त धान्य दुकानात उपालब्ध असलेल्या प्रमाणित यादीप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे. असे तालुका दंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन, अहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.