बाबासाहेब वाकळे म्हणाले, आज जनता कोरोना, वीज बिल, महागाईने होरपळत असताना नागरिकांना दिलासा देण्याऐवजी हे सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला. तर आता सध्याचे गृहमंत्री हे पोलिसांकरवी हप्ते गोळा करण्याचे काम करत आहेत, विशेष म्हणजे ही बाब माजी पोलीस आयुक्तांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सरकारमधील मंत्री प्रशासनाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करत आहेत, हेच यातून दिसून येते. सरकार भ्रष्टाचार करण्यातच गुंतले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
वंदना पंडित, अमोल निस्ताने, संदीप अवचट, व्यंकटेश बोमादंडी, अमित गटणे, विवेक सरनाईक, साखला, हुजेफा सय्यद, सुजित खरमाळे, गणेश साठे, उमेश साठे, आकाश सोनवणे, राकेश भाकरे, यश शर्मा, आशिष देशमुख, शशांक कुलकर्णी, कैलास गर्जे, किशोर कटोरे, साहिल शेख, योगेश मुथा, डॉ.दर्शन करमाळकर, अभिजित सोनवणे, मृणाली मुथा, सुरज शिंदे, वैभव झोटिंग, सविता कोटा, प्रिया जानवे, स्वाती पवळे, सुप्रिया देपोलकर, गोरख शिंदे, नागेश शिंदे, पेमराज शिंदे, कार्तिक नगारे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, ऋग्वेद गंधे आदी उपस्थित होते.
फोटो आहे.